खैरेंचे मनसुबे आता चालणार नाही त्यांचा पराभव निश्चित, आमदार चव्हाणांचा प्रबळ दावा

Foto

औरंगाबाद- हिंदू मतावर डोळा ठेवून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरे यांना आता आगामी लोकसभा निवडणुकीतीत मतदार त्यांची जागा दाखवून देणार असून खा. चंद्रकांत खैरे यांचा प्रभाव निश्चित असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. प्रकाश आंबडेकरांनी आघाडीत सहभाग घेतला तर त्यांचे आम्ही स्वागतच करू राज्यातील चाळीस जागांचा निर्णय झाला असून उर्वरित ८ जागांचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ घेतील आणि महाआघाडी स्थापन होईल असे संकेत त्यांनी यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिले. पक्षाने आदेश दिले तर औरंगाबाद लोकसभा मी लढवणार असेही त्यांनी बोलताना अधोरेखित केले. 

 

राजाबाजार-शहागंज मध्ये झालेल्या दंगल प्रकरणी ते म्हणाले कि भाजप-शिवसेना आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खा. खैरे यांचावर जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोप करत त्यांनी यावेळी खासदार चंद्रकांत खैरेंच्या राजकीय डावपेचावर तोफ डागली. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित असल्याचे सांगत आमदार चव्हाण यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रशचिन्ह निर्माण केले. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खा. खैरेंचे मनसुबे आता चालणार नाही त्यांचा पराभव हा निश्चित असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.